Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Delhi vs Jharkhand Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी सामन्यात झारखंडने पहिल्या सामन्यात ३८२ धावा केल्या. तर दिल्लीने ७ बाद ३८८ धावा केल्या आणि चौथ्या दिवशी सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.
Ayush badoni
Ayush badoni esakal
Updated on

Ayush Badoni Double Century in Ranji Trophy 2024-25 : रणजी ट्रॉफी स्पर्धेत झारखंडविरूद्धच्या सामन्यात दिल्लीच्या आयुष बदोनीने दणदणीत द्विशतक ठोकले. झारखंडच्या पहिल्या डावातील ३८२ धावांच्या प्रत्यत्तरात दिल्लीची खेळी लावून धरली आणि एका बाजूने फलंदाज बाद होत असताना आयुष मैदानात टीकून राहिला. त्याने सामन्यात दिल्लीला आघाडी मिळवून दिली. पण ४ चौथ्या दिवशी दिल्लीच्या पहिल्या डवात ७ बाद ३८८ अशी धावसंख्या असताना सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com