Agni Chopra scores double Century esakal
Cricket
Agni Chopra ने ठोकले सलग दुसरे द्विशतक, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला; टीम इंडियाचा Future Star!
Agni Chopra scores double Century : मिझोरामचा स्टार अग्नी चोप्राने रणजी ट्रॉफीच्या प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले आहे.
Ranji Trophy 2024-25 Agni Chopra: मिझोराम संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारृा अग्नी चोप्रा मागील काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करून मैदान गाजवतोय. मिझोराम संघाचा स्टार फलंदाज अग्नीने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट लीगमध्ये सलग दुसरे द्विशतक झळकावले. चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचा तो मुलगा आहे. त्याने मणिपूर संघाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात २६९ चेंडूंत २९ चौकार व १ षटकाराच्या मदतीने २१८ धावांची खेळी केली. या मोसमातील हे त्याचे तीन सामन्यांतील तिसरे शतक आहे.

