
Virat Kohli Domestic Tournament Stats: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धेत आपापल्या राज्याच्या संघाकडून खेळताना दिसले. आता उद्या स्टार फलंदाज विराट कोहली रणजी करंडक स्पर्धेत उद्या दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. विराटला खेळताना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी दिल्ली क्रिकेट संघटनेने १० हजार प्रेक्षक क्षेमतेची आसनव्यवस्थान केली आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपणही होणार आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रेल्वे संघाविरुद्ध ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.