Ranji Trophy: विदर्भाला पहिल्या डावात आघाडीची संधी; रणजी करंडक, विदर्भाच्या २८६ धावांना ओडिशाचे ६ बाद १२२ असे उत्तर
Vidarbha Cricket: विदर्भाने रणजी करंडक एलिट ‘अ’ गटातील ओडिशाविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यात दुसऱ्या दिवशी पकड मजबूत केली. ध्रुव शोरे, अक्षय वाडकरसह फलंदाजांची कामगिरी संघासाठी निर्णायक ठरली.
नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडिअमवर सुरू असलेल्या रणजी करंडक (एलिट ‘अ’ गट) क्रिकेट स्पर्धेतील ओडिशाविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यावर गतविजेत्या विदर्भाने दुसऱ्याच दिवशी आपली पकड मजबूत केली.