Ranji Trophy : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

ranji trophy Ex-Rajasthan opener rohit sharma passes away at 40 marathi news
ranji trophy Ex-Rajasthan opener rohit sharma passes away at 40 marathi news

Ex-Rajasthan Opener Rohit Sharma Passes away : क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. माजी भारतीय रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन झाले आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. तो बरेच दिवस आजारी होता. रोहितवर राजस्थानमधील जयपूरमध्ये उपचार सुरू होते. मात्र गेल्या शनिवारी या खेळाडूने जगाचा निरोप घेतला. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ranji trophy Ex-Rajasthan opener rohit sharma passes away at 40 marathi news
IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या स्टार खेळाडूचा अपघात; सुपर बाइक पडली महागात

रोहित शर्माने राजस्थानच्या जयपूरमध्ये स्वतःची क्रिकेट अकादमीही चालवल्याचे सांगितले जात आहे. आरएस अकादमी असे याचे नाव आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू होता ज्याच्याकडे गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता होती.

ranji trophy Ex-Rajasthan opener rohit sharma passes away at 40 marathi news
Ind vs Eng : शेवटच्या कसोटीत सामन्यात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, प्लेइंग-11 मधून 'या' 2 खेळाडूंचा पत्ता कट?

माजी भारतीय रणजी क्रिकेटपटू रोहित शर्माने 2004 मध्ये सर्व्हिसेसविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो राजस्थानसाठी 7 रणजी सामने खेळला आहे. याशिवाय माजी क्रिकेटपटूने 28 एकदिवसीय रणजी सामने आणि 4 टी-20 सामनेही खेळले आहेत.

ranji trophy Ex-Rajasthan opener rohit sharma passes away at 40 marathi news
Viral Video : युझवेंद्र चहल आला रडकुंडी; 25 वर्षीय महिला कुस्तीपटूने उचलले खांद्यावर अन्...

माजी रणजी क्रिकेटपटू रोहित शर्मा 2004 ते 2009 दरम्यान क्रिकेट खेळला. यानंतरही त्याने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली नाही, उलट तो अ श्रेणी क्रिकेट खेळायचा. रोहित शर्मा एक अष्टपैलू तसेच कर्णधार होता. रणजी ट्रॉफी, फर्स्ट क्लास व्यतिरिक्त त्याने इतर क्रिकेट फॉरमॅटमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. या खेळाडूबद्दल असे म्हटले जाते की तो एक स्फोटक फलंदाज होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com