

Ranji Trophy
sakal
न्यू चंडीगड : पृथ्वी शॉ (७४ धावा) याची दमदार अर्धशतकी खेळी आणि अर्शिन कुलकर्णी (१३३ धावा) याची शानदार शतकी खेळी याच जोरावर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने न्यू चंडीगड येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील साखळी फेरीच्या पंजाबविरुद्धच्या लढतीत पहिल्या डावात ३५० धावा फटकावल्या.