Parth Rekhade | Ranji Trophy | Mumbai vs Vidarbha
Parth Rekhade | Ranji Trophy | Mumbai vs VidarbhaSakal

Ranji Trophy: विदर्भाचा पठ्ठ्या! एकाच ओव्हरमध्ये रहाणे, सूर्या अन् दुबे बाद; मुंबईसाठी 'आऊट ऑफ सिलॅबस' ठरलेला पार्थ रेखाडे कोण?

Who is Parth Rekhade? : रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एकाच षटकात अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना बाद करणाऱ्या पार्थ रेखाडेबद्दल जाणून घ्या.
Published on

रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून उपांत्य फेरीचे सामने सध्या सुरू आहे. नागपूरला विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर विदर्भ विरुद्ध मुंबई संघात उपांत्य सामना होत आहे.

या सामन्यात मुंबई संघाला २५ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू नडला आहे. त्याने पहिल्याच डावात मुंबईला संकटात टाकले आहे. या खेळाडूचं नाव आहे पार्थ रेखाडे.

उपांत्य सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात १०७.५ षटकात ३८३ धावा केल्या. विदर्भाचा डाव दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (१८ फेब्रुवारी) रोजी संपला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com