

Ranji Trophy 2025 Mumbai vs Vidharbha Shivam Dube take 5 wickets : गतविजेत्या मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भविरुद्ध दुसऱ्या दिवशी पुनरागमन केले. पहिल्या दिवशी विदर्भने ५ बाद ३०८ धावा करून मुंबईच्या गोलंदाजांना रडवले होते, परंतु दुसऱ्या दिवशी शिवम दुबेसह सर्वच गोलंदाज चमकले. विदर्भचा निम्मा संघ ५९ धावांवर तंबूत पाठवण्यात त्यांना यश आले. शिवमने पाच विकेट्स घेतल्या.