

RASHID KHAN
esakal
RASHID KHAN FIRST BOWLER TO ACHIEVE THIS T20I WORLD RECORD: अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वे संघाला १९ धावांनी पराभूत केलं आहे. याच सामन्यात अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू राशिद खाननेही इतिहास रचला आहे.
त्याच्या गोलंदाजीने या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आजपर्यंत पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाला करता आलेला नाही.