अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे या यादीत पहिल्या २० जणांमध्ये एकही भारतीय नाही..अफगाणिस्तानचा टी२० कर्णधार आणि स्टार फिरकीपटू राशिद खानने इतिहास घडवला आहे. सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत सोमवारी (१ सप्टेंबर) अफगाणिस्तानचा सामना संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध झाला. या सामन्यात खेळताना राशिद खानने मोठा विक्रम केला आहे.या सामन्यात अफगाणिस्तानने युएईसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईचा संघ २० षटकात ८ बाद १५० धावाच करू शकला. त्यामुळे अफगाणिस्तानने ३८ धावांनी विजय मिळवला..Rashid Khan Brother Death: धक्कादायक! राशिद खानच्या भावाचे निधन, T20 सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली.या सामन्यात राशिद खानने ४ षटकात २१ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. त्याने युएईच्या मधल्या फळीतील तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे राशिद आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मागे टाकत सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याच्या आता ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १६५ विकेट्स झाल्या आहेत. .साऊथीने १२६ टी२० सामन्यांत १६४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच न्यूझीलंडच्याच ईश सोधीने १२६ टी२० सामन्यांत १५० विकेट्स घेतल्या आहेत. या तिघांनाच १५० धावांचा टप्पा पार करता आला. विशेष म्हणजे पहिल्या २० जणांमध्ये एकही भारतीय नाही. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स अर्शदीप सिंगच्या नावावर असून त्याने ९९ विकेट्स घेतल्या आहेत. तो जागतिक यादीत २३ व्या क्रमांकावर आहे..ZIM vs AFG : झिम्बाब्वे इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर होता, पण Rashid Khan आडवा आला; विजय खेचून आणला.आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज१६५ विकेट्स - राशिद खान (९८ सामने)१६४ विकेट्स - टीम साऊदी (१२६ सामने)१५० विकेट्स - ईश सोधी (१२६ सामने)१४९ विकेट्स - शाकिब अल हसन (१२९ सामने)१४२ विकेट्स - मुस्तफिझूर रेहमान (११३ सामने).दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात राशिदव्यतिरिक्त शराफुद्दिन अश्रफनेही ३ विकेट्स घेतल्या, तर फझलहक फारूकी आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. युएईकडून कर्णधार मुहम्मद वासिमने ६७ धावांची खेळी केली, तर राहुल चोप्राने नाबाद ५२ धावा केल्या. मात्र त्यांच्याव्यतिरिक्त कोणीही १५ धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही.तत्पुर्वी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८८ धावा केल्या. त्यांच्याकडून इब्राहिम झाद्रानने ६३ धावांची खेळी केली, तर सदिकुल्लाह अटलने ५४ धावांची खेळी केली. तसेच अझमतुल्ला ओमरझाईने नाबाद २० आणि करिम जनातने नाबाद २३ धावा केल्या. युएईकडून मुहम्मद रोहिद आणि साघिर खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत..FAQs१. राशिद खानने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये किती विकेट्स घेतल्या?(How many wickets has Rashid Khan taken?)👉 राशिद खानने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १६५ विकेट्स घेतल्या आहेत.२. राशिद खानने कोणाला मागे टाकले?(Whom did Rashid Khan surpass?)👉 राशिद खानने न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मागे टाकले.३. राशिद खानने हा विक्रम कधी केला?(When did Rashid Khan achieve this record?)👉 १ सप्टेंबर २०२५ रोजी युएईविरुद्धच्या सामन्यात.४. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये टॉप-३ विकेट घेणारे गोलंदाज कोण?(Who are the top 3 wicket-takers in T20Is?)👉 राशिद खान (१६५), टीम साऊदी (१६४), ईश सोधी (१५०).५. राशिद खानने किती आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत?(How many matches has Rashid Khan played?)👉 राशिद खानने ९८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.