IND vs AUS 3rd Test: रोहितने सलामीला फलंदाजी करावी! सुनील गावसकर, रवी शास्त्री यांचा आग्रह

Ravi Shastri and Sunil Gavaskar on Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून ॲडलेड कसोटीत निराशाजनक कामगिरी झाली. याचा फटका भारतीय संघाला बसला. आता त्याने ब्रिस्बेन कसोटीत सलामीला फलंदाजी करावी, असं गावसकर व शास्त्री यांनी म्हटलं आहे.
Rohit Sharma | IND vs AUS 3rd Test |
Rohit Sharma | IND vs AUS 3rd Test |Sakal
Updated on

Australia vs India 3rd Test: कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून ॲडलेड कसोटीत निराशा झाली. दोन्ही डावांमध्ये मिळून त्याला नऊ धावाच करता आल्या. याचा फटका भारतीय संघाला बसला. ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना जिंकत १-१ अशी बरोबरी साधली.

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे महान फलंदाज सुनील गावसकर व माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माने सलामीला फलंदाजी करावी, असा आग्रह धरला. यामुळे रोहितला स्वत:ला आक्रमक व अभिव्यक्त होता येईल, असे गावसकर, शास्त्री यांना वाटते.

Rohit Sharma | IND vs AUS 3rd Test |
IND vs AUS, 3rd Test: गॅबा कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मिळणार गुडन्यूज, तर टीम इंडियाचं टेन्शन वाढणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com