Shreyas Iyer awarded fielding medal by Ravi Shastri : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या ताफ्यात उत्साहाचे वातावरण दिसले. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासह सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. सामन्यानंतर टीम इंडिायच्या ड्रेसिंग रुममध्ये एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आणि त्यांच्या हस्ते सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या खुमारदार शैलीतील समालोचनाचा सर्वांनी आनंद लुटला अन् रोहित तर लोटपोट झाला.