

R Ashwin Slams Team India Selection
esakal
R Ashwin Slams Team India Selection: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्याने माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नाराज झाला आहे. सिराजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर अश्विनने प्रश्न उपस्थित केले.
इतकंच नाही, तर आगामी वनडे वर्ल्ड कपमध्येही सिराजला संधी मिळणार नाही, अशी शक्यता त्याने व्यक्त केली. सिराजला संघातून बाहेर ठेवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, असंही अश्विन म्हणाला.