India Tour of England : विराट कोहली व रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया प्रथमच या सीनियर खेळाडूंशिवाय इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा हे वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर संघात असणार आहेत. पण, विराट व रोहितची पोकळी भरून काढणे अवघड आहे. मात्र, रवींद्र जडेजाने पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे आणि त्याचे मनोबल उंचावण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. याच उंचावलेल्या मनोबलाच्या जोरावर तो इंग्लंडला फिरकीवर नाचवू शकतो.