
भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा क्रिकेटपटू यश दयालसमोरील अडचणी सध्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. आता याच प्रकरणात त्याचे पाय अधिक खोलात अडकल्याचे दिसत आहेत.
त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर शारीरिक अत्याचार, लैंगिक शोषण आणि लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.