

Royal Challengers Bengaluru FULL SCHEDULE SQUAD CAPTAIN IPL 2025 : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये बरेच संघ नव्या कर्णधारासह मैदानावर उतणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार... यासह कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा कर्णधार जाहीर केलेला नाही. पण, RCB ने विराट कोहलीकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी न सोपवता पाटीदारवर विश्वास दाखवला. RCB ने ही चांगली खेळी केली असली तरी त्यांनी संघ निवडीत घातलेला घोळ त्यांची डोकेदुखी नक्की वाढवणार आहे.