जेकब बेथेल २१ वर्षे ३२९ दिवसांचा असताना पहिल्यांदा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.
आयर्लंड मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली जॉस बटलरसारखा वर्ल्ड कप विजेता कर्णधारही खेळणार आहे.
ही मालिका १७, १९ आणि २१ सप्टेंबरला डब्लिन येथे खेळवली जाणार आहे.
Youngest Captain In 136 Years Of International Cricket : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी आयर्लंडविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेसाठी जेकब बेथेल ( Jacob Bethell) याची कर्णधारपदी घोषणा केली आहे. पदार्पणानंतर बेथेलने सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु तो ट्वेंटी-२० संघात हॅरी ब्रूकच्या जागी नेतृत्व करणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेनंतर हॅरी ब्रूक विश्रांती घेणार आहे.
बेथेलची कर्णधारपदी निवड झाल्यानंतर इतिहास घडला आहे आणि इंग्लंडच्या १३६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात जे नव्हते घडले, ते आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडणार आहे. १७, १९, २१ सप्टेंबरला डबलीन येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली दोन वेळचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार खेळणार आहे.