
RCB vs DC WPL 2025 : महिला प्रिमिअर लागमधील चौथा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू व दिल्ली कॅपिटल्समध्ये रंगला आहे. दोन्ही संघानी लीगमधील पहिले सामने जिंकले आहेत. दिल्लीने गुजरातला पराभूत केले, तर आरसीबीने डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. आजच्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये जेमिमाह रॉड्रीग्सने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. पण आरसीबीच्या गोलंदाजांनी कोणालाही मोठी खेळी करू दिली नाही आणि विजयासाठी १४२ धावांचे सोपे लक्ष्य स्वीकारले.