'Whiskey' च्या प्रमोशनसाठी विजय मल्ल्याने खरेदी केली बंगळुरू फ्रँचायझी; मुंबईच्या संघासाठी लावलेली बोली, पण... Video Viral

Royal Challengers Bangalore (RCB) संघाने आयपीएल २०२५ चे जेतेपद जिंकल्यानंतर माजी मालक विजय मल्ल्या सोशल मीडियावर जास्तच सक्रीय झाला आहे. त्याने अलीकडे एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला की RCB हा संघ त्याच्या 'Royal Challenge' व्हिस्की ब्रँडचा प्रचार करण्यासाठीच खरेदी केला होता.
Vijay Mallya
Vijay Mallyaesakal
Updated on

Vijay Mallya reveals real reason behind buying Bangalore IPL team रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावण्यासाठी तब्बत १८ वर्ष वाट पाहावी लागली. २००८ पासून ही फ्रँचायझी आयपीएल खेळतेय आणि आयपीएल २०२५ पूर्वी तीनवेळा ती जेतेपदाच्या जवळही पोहोचली होती. पण, जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी त्यांना २०२५ ची वाट पाहावी लागली. विराट कोहलीची स्वप्नपूर्ती झाली आणि RCB चा माजी मालक आणि फरार विजय मल्ल्या याने धक्कादायक खुलासा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com