Richmond Fourth XI all out for 2 runs भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यजमान इंग्लंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, त्याचवेळी इंग्लंडमधील एका संघाने लाजीरवाणा विक्रम नावावर केला आहे. Middlesex County League मधील थर्ड टायर विभागीय लढतीत एक संघ ५.४ षटकांत २ धावांवर ऑल आऊट झाला. त्यापैकी एक धाव तर वाईडमुळे आली होती.