
१२ चेंडूंत ३४ धावा... असं समीकरण असताना तेही फायनलमध्ये, कोणत्याही खेळाडूला दडपण आलं असतं. पण जशी ही दडपणाची परिस्थिती असते, तशीच ती आपल्या संघासाठी आणि देशासाठी हिरो बनण्याचीही संधी खेळाडूकडे असते, तीच संधी ७ वर्षांपूर्वी दिनेश कार्तिकने साधली आणि त्यानं कायमचं इतिहासात नाव कोरलं.
ही घटना आहे ७ वर्षांपूर्वी १८ मार्च २०१८ साली झालेल्या निदाहास ट्रॉफीच्या फायनल सामन्यातील.