Ajinkya Rahane On Gautam Gambhir And Selectors
esakal
Ajinkya Rahane On Gautam Gambhir And Selectors: भारतीय संघाच्या मायदेशातील कसोटी क्रिकेटमधील निर्विवाद वर्चस्वाला धक्का बसला आहे. २०२५ मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीत ३-० अशी मालिका जिंकून इतिहास रचला. भारताची घरच्या मैदानावरील १२ वर्षांची अपराजित मालिका खंडित केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही भारतात येऊन २-० अशी कसोटी मालिका जिंकली. पण, हे दोन पराभव इंग्लंड दौऱ्यावरील २-२ अशा बरोबरीमुळे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या २-० अशा विजयामुळे विस्मरणात गेले. पण, त्या पराभवांमुळे कसोटी क्रिकेटमधील भारताचे भविष्य धोक्यात असल्याची चिंता सतावत आहे.