Usman Khawaja Retirement : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी निवृत्तीचा बॉम्ब! निवड समितीकडून दुर्लक्षित राहिल्याने घेतला निर्णय, भारताला...

Usman Khawaja Announces International Retirement: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजाने निवृत्तीचा निर्णय जाहीर करत क्रिकेटविश्वाला हादरवून सोडलं आहे. सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या ॲशेस कसोटीनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
Usman Khawaja Announces International Retirement Post Sydney Test

Usman Khawaja Announces International Retirement Post Sydney Test

esakal

Updated on

Australia Ashes 2025 Usman Khawaja last match : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अॅशस मालिकेतील पाचवी कसोटी ही त्याच्या कारकीर्दितील शेवटची मॅच असणार आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ८७ कसोटीत ४३.३९च्या सरासरीने ६२०६ धावा करताना १६ शतकं व २८ अर्धशतकं झळकावली आहेत. भारताच्या २०२३ च्या दौऱ्यावर त्याने ४ सामन्यांत ४७.५७ च्या सरासरीने ३३३ धावा करताना १८० धावांच्या सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली होती. याशिवाय त्याने ४० वन डे सामन्यांत ४२ च्या सरासरीने १५५४ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व १२ अर्धशतकं आहेत. ९ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर २४१ धावा आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com