

Unforgettable T20 World Cup Moments
Sakal
- सुनंदन लेले
क्रिकेट देवाचे माझ्यावर खूप उपकार आहेत. क्रिकेट वार्तांकन करताना दर्जेदार सामने जवळून अनुभवता आले आणि जगभर फिरताही आले. टी-२० क्रिकेटचे सर्व विश्वकरंडक स्पर्धांचे मला पत्रकार म्हणून वार्तांकन करता आले. २००७ मध्ये सुरू झालेली टी-२० विश्वकरंडक स्पर्धा अगदी कानामागून आली आणि तिखट झाली आहे.
या स्पर्धेची लोकप्रियता वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली आहे. २००७च्या विश्वकरंडक स्पर्धेपासून प्रत्येकवेळी एक तरी असा सामना किंवा प्रसंग घडला ज्याने मनात घर केले. या लेखात अशाच काही मोजक्या संस्मरणीय प्रसंगांची उजळणी.