टॉप ५ महान फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान नाही.
यादीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ब्रायन लारा, जो रूट आणि केन विल्यम्सन यांचा समावेश आहे.
जॅक कॅलिस हा आतापर्यंतचा सर्वात महान क्रिकेटपटू आहे.
Virat Kohli and Rohit Sharma missing from Ponting’s top 5 : महान फलंदाजांची जेव्हा चर्चा होते, तेव्हा विराट कोहली हे नाव असतेच. पण, ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगच्या मते सर्वकाळातील पाच महान फलंदाजांमध्ये विराट व रोहित शर्मा यांना स्थान नाही. माजी कर्णधाराच्या यादीत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड अशा दोन भारतीय दिग्गजांचा समावेश आहे. पाँटिंगने ब्रायन लाराला ‘सर्वात कुशल’ फलंदाज मानले आहे आणि त्यानंतर त्याने आधुनिक युगातील 'फॅब फोर' मधील जो रूट आणि केन विलियम्सन या दोन खेळाडूंची निवड केली आहे.