Rinku Singh reportedly received three threat calls from an underworld gang linked to Dawood Ibrahim
esakal
Dawood gang ₹5 crore demand from Indian cricketer : भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग याला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रांचकडून ही माहिती मिळाली आहे आणि त्यानुसार रिंकूला धमकी देण्यामागे दाऊद इब्राहिम टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. रिंकूच्या प्रमोशनल टीमला फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान धमकीचे तीन संदेश पाठवले गेले. त्यामधून रिंकूकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक केली आहे.