यूपीटी२० लीगमध्ये रिंकू सिंगने अवघ्या ४८ चेंडूत नाबाद १०८ धावा झळकावल्या.
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मेरठची ४ विकेट्स ३८ धावांवर पडली होती.
रिंकूने साहब युवराज सिंगसोबत १३४ धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
Rinku Singh fastest T20 hundred for Meerut in UPT20 : आशिया चषक स्पर्धेत निवड झालेल्या रिंकू सिंगने काल यूपी ट्वेंटी-२० लीगमध्ये वादळी शतक झळकावले. १६८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना मेरठ माव्हरिक्स संघाचे ४ फलंदाज ३८ धावांवर माघारी परतले. तेव्हा रिंकू मैदानावर आला आणि साहब युवराज सिंगसोबत १३४ धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. रिंकूने सुरुवातीला फक्त ३२ चेंडूंत ५३ धावा केल्या होत्या, परंतु नंतर गिअर बदलला व ४८ चेंडूंत नाबाद १०८ धावांची खेळी साकारली.