

Rishabh Pant: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने बऱ्याचदा गरजूंना मदत करताना दिसला आहे. नुकतीच त्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठीही मदतीचा हात पुढे केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यामुलाने ही मदत परत करण्याबद्दल सांगितलं. नक्की हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊ.
झाले असे की मंगळवारी (२७ ऑगस्ट) TrueIndScenes या नावाच्या एक्सवरील (ट्वीटर) युझरने ऋषभ पंतला टॅग करत ९० हजार मदतीचे अवाहन केले होते. या युझरने दिलेल्या माहितीनुसार त्याचं नाव कार्तिकेय मौर्य आहे. त्याने पोस्टमध्ये केट्टो लिंक शेअर केली होती आणि त्याच्या शिक्षणासाठी पैशांची मदत मागितली होती.