भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत रिषभ पंतच्या धाडसी पुनरागमनाचे कौतुक होत आहे,
पण इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉईड यांनी त्याच्या दुखापतीवर संशय व्यक्त केला.
डेव्हिड लॉईड यांनी 'लेजेंड्स लाउंज'मध्ये अनेकांना वाटले की पंत दुखापत अतिशयोक्ती करून दाखवत आहे आणि नाटक करतोय असे मत दिले.
Rishabh Pant’s Brave Return Questioned by England Legend : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत रिषभ पंतच्या धाडसी वृत्तीचे कौतुक होत असताना इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने वादग्रस्त विधान केलं आहे. मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत रिषभच्या पायाला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. तो पुन्हा फलंदाजीला येईल की नाही, अशी शंका होती. पण, त्याने जिद्द दाखवली आणि मैदानावर उतरून अर्धशतकी खेळी करताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली.