
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठी लखनौ सुपर जायंट्सने कर्णधार म्हणून घोषित केले आहे. त्याला आयपीएल २०२५ लिलावात लखनौने २७ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूही आहे. दरम्यान, पंत लखनौचा केएल राहुलनंतरचा दुसराच कर्णधार आहे. दरम्यान, लखनौने त्याला कर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर त्याने स्टार स्पोर्ट्सशी पहिल्यांदाच संवाद साधला.