Rishabh Pant wears Virat Kohli’s jersey number 18 in India A vs South Africa A Test
esakal
Tanush Kotian 4 wickets highlights India A vs South Africa A 1st Test : भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ यांच्यातल्या चार दिवसीय कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. बंगळुरूत सुरू असलेल्या या सामन्यातून रिषभ पंतने ( Rishabh Pant Comeback) पुनरागमन केले. भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवत असलेल्या पंतने आज १८ क्रमांकाची जर्सी घातली होती आणि त्यामुळे तो कसोटीतून निवृत्त झालेल्या विराट कोहलीची ( Virat Kohli Jersey 18 ) जागा घेतोय का, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, कसोटीचा पहिला दिवस मुंबईचा गोलंदाज तनुष कोटियन याने गाजवला. आफ्रिकेच्या ९ विकेट्स पडल्या आहेत.