
RISHABH PANT WILL NOT GET SINGLE MATCH IN CHAMPIONS TROPHY 2025: रोहित शर्माचा फॉर्म परतला, अक्षर पटेलची अष्टैपलू कामगिरी अन् सातत्य... आपल्याला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पाहायला मिळालं. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेपूर्वी प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवण्याचं लक्ष्य टीम इंडियाला खुणावतंय. पण, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतला अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही आणि १२ फेब्रुवारीला होणाऱ्या लढतीत तो खेळताना दिसेल, याची शक्यताही नाही. टीम इंडियाचे हे डावपेच ऋषभ पंतच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरवत आहेत. त्यामुळेच संजू सॅमसनसारखी ( Sanju Samson) ऋषभची अवस्था होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.