भारत-पाकिस्तान यांच्यातील WCL सामना रद्द
पाकिस्तानी खेळाडूंकडून भारतीयांवर टीका
शाहिद आफ्रिदीनंतर आणखी एक खेळाडू संतापला
India vs Pakistan WCL match controversy explained : भारत-पाकिस्तान यांच्यातला जागतिक अजिंक्यपद लेजंड्स ( WCL) मधील सामना रद्द झाल्यावरून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचा जळफळाट झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांविरोधातील पवित्रा आणखी आक्रमक केला आहे आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यालाही आता विरोध होताना दिसतोय. याचमुळे WCL मधील भारत-पाकिस्तान सामन्यातून भारताच्या माजी खेळाडूंनी माघार घेतली. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने टीका केली आणि त्यात आता अब्दुल रौफ ( Abdur Rauf ) यानेही उडी घेतली आहे.