Story behind Rohit Sharma’s 3015 number plate on Lamborghini Urus : रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानावर कधी पुन्हा षटकार खेचताना दिसतोय याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. बांगलादेश दौऱ्यातून त्याचे पुनरागमन होणार होते, परंतु हा दौरा स्थगित करण्यात आला. आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित व विराट कोहली ब्लू जर्सीत दिसतील. इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर तो लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्टीसाठी गेला होता. रोहित कालच मुंबईच परतला आणि चाहत्यांसाठी एक मोठं सप्राईजही आणलं.