Rohit Sharma with dedicated stand at Wankhede Stadium
सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांनंतर वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाचं स्टँड दिसणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ( MCA) रोहित शर्माच्या अविश्वसनीय कारकीर्दीचा गौरव म्हणून स्टँडला हिटमॅनचे नाव दिले. रोहितने त्याच्या स्टँडच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आई-वडिलांना मंचावर बोलावले. तो स्वतः व्यासपीठावरून खाली उतरला अन् आई-वडील व पत्नी रितिकाला सोबत घेऊन पुन्हा मंचावर आला.त्याच्या या कृतीने मन जिंकले.