

Shubman Gill
esakal
Shubman Gill Captaincy Record: इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने २-१ ने गमावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवर चर्चा सुरू झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर बीसीसीआयने वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडून काढून शुभमन गिलकडे दिले. त्यानंतर गिल आणि गंभीर यांच्या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आतापर्यंत त्यांना तितके यश मिळालेले नाही.