Rohit Sharma cryptic toy picture Instagram meaning : रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागच्या वर्षी रोहितने वर्ल्ड कप उंचावल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम ठोकला होता. आता तो फक्त वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करून आहे. ३७ वर्षीय रोहितला २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. पण, तोपर्यंत त्याचं वय ३९ होईल आणि या वयात त्याचे वन डे वर्ल्ड कप खेळणे थोडे अवघडच आहे. त्यात रोहितच्या आजच्या इंस्टाग्राम पोस्टने त्याच्या वन डे तून निवृत्तीच्या संकेतांना बळ दिलं आहे.