
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने बुधवारी (७ मे) सर्वांना धक्का दिला. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो कसोटीमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. त्याने चाहत्यांचे त्यांच्या प्रेमासाठी आभारही मानले.
पण त्याचबरोबर वनडेमध्ये मात्र यापुढे खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. रोहितने यापूर्वीच जून २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे आता रोहित केवळ वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे.