रोहित शर्मा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये तो पत्नी रितिका आणि सासूसोबत मजेशीर डान्स करताना दिसतो. चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे..भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे त्याची वनडे क्रिकेटमधील भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत असतानाच, तो मुंबईत त्याची नवी लँबोर्गिनी कार चालवतानाही दिसत आहे. अशातच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याची पत्नी रितिका आणि त्याची सासू यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे..'Rohit Sharma इतका मारेल ना तुला', युवराज सिंगने कोणाला दिली वॉर्निंग? पाहा Video.खरंतर दोन वर्षांपूर्वी मार्च २०२३ मध्ये रितिकाच्या भावाचे म्हणजेच रोहितच्या मेव्हण्याचे लग्न झाले होते. त्यावेळी रोहितने संगीत सोहळ्यात पत्नी आणि सासूसोबत एक डान्स परफॉर्मन्स केला होता. त्यावेळी त्याच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता..आता यात व्हिडिओच्या संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये रोहितने मेव्हण्याच्या लग्नात जसा डान्स केला होता, तशाच डान्स स्टेप्स तो त्याची सासू आणि पत्नीसोबत करताना दिसत आहे. यामध्ये ते तिघंही साध्या घरच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ त्यांच्या डान्स सरावाचा आहे की आत्ता त्यांनी पुन्हा एकदा त्याच डान्सला रिक्रिएट करण्यासाठी केला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. पण काही युझर्सचे म्हणणे आहे की त्यांनी हा डान्स रिक्रिएट केला आहे, तर काहिंनी असा अंदाज बांधला आहे की हा सरावाचा व्हिडिओ असावा. पण रोहितच्या चाहत्यांकडून मात्र या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे..रोहित काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२५ नंतर कुटुंबासमवेत फिरायला गेला होता. यावेळी त्याने त्याच्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवला. रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने त्याच्याकडे आता कुटुंबासमवेत राहण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा आहे. रोहितने सध्या वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्याने वनडे वर्ल्ड कप २०२७ पर्यंत खेळण्याची यापूर्वी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सध्या त्याच्या वनडेतील भवितव्यावर चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने युवा खेळाडूंसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे, त्यामुळे कदाचित ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर निवृत्ती घेऊ शकतो, अशी चर्चा आहे..Rohit Sharma: 'हिटमॅन’ रोहित शर्मा बनणार बिझनेस किंग; 'या' स्टार्टअपमध्ये केली मोठी गुंतवणूक .रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत ६७ कसोटीत १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या आहेत. २७३ वनडेत त्याने ३२ शतके आणि ५८ अर्धशतकांसह १११६८ धावा केल्या आहेत. १५९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ५ शतके आणि ३२ अर्धशतकांसह ४२३१ धावा केल्या आहेत..FAQs१. रोहित शर्मा डान्स व्हिडिओ कधीचा आहे?(When is Rohit Sharma’s dance video from?)रोहित शर्माचा हा व्हिडिओ मार्च २०२३ मधील लग्नातील डान्सचा रिक्रिएशन असल्याचे सांगितले जाते.२. रोहितसोबत डान्समध्ये कोण दिसत आहेत?(Who is seen dancing with Rohit?)पत्नी रितिका आणि सासू डान्समध्ये रोहितसोबत दिसतात.३. हा व्हिडिओ पुन्हा का व्हायरल झाला?(Why has the video gone viral again?)चाहत्यांना त्याचा कौटुंबिक आणि मजेशीर अंदाज आवडल्यामुळे व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला.४. रोहित शर्माने कोणत्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे?(Which formats has Rohit Sharma retired from?)रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.