रिषभ पंतने स्वातंत्र्य दिनानिमित्त चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजयानंतरचा अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडूंच्या विजयानंतरच्या भावना दिसून येत आहे. यावेळी रोहित शर्माने वनडे निवृत्तीवर मस्करीत उत्तरही दिले होते..भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता रिषभ पंतने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीवर मस्करीत बोलताना दिसत आहे. खरंतर रिषभ पंतने हा व्हिडिओ भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर केला आहे. हा व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा भारताने जिंकल्यानंतरचा आहे. .Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण....भारतीय संघाने मार्च २०२५ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात न्यूझीलंडनला ४ विकेट्सने पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडेतील भवितव्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले होते. या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाला होता. पण आता शुक्रवारी (१५ ऑगस्ट) आत्तापर्यंत समोर न आलेला व्हिडिओ रिषभ पंतने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पंतनेच रेकॉर्ड केल्याने समजत आहे..या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते की पंत रोहित आणि शुभमन गिलसह ड्रेसिंग रुममध्ये असून त्यांनी तिथूनच टीव्हीवर रवींद्र जडेजाने केएल राहुलसोबत फलंदाजी करताना मारलेला विजयी चौकार पाहिला आणि जल्लोष करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय संघातील सर्वच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आनंद साजरा करताना दिसत आहेत. .Rishabh Pant: याला म्हणतात जिद्द! पंत फ्रॅक्चर असाताना फक्त मैदानातच उतरला नाही, तर अर्धशतक करत ३ विक्रमही रचले.प्रत्येकाचे खऱ्याखुऱ्या भावना या व्हिडिओतून दिसत आहेत. रवींद्र जडेजा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, अक्षर पटेल असे सर्वच खेळाडू मैदानात मस्ती करतानाही दिसत आहेत. तसेच ट्रॉफीसह फोटो काढताना दिसत आहेत.यावेळी रोहित शर्मा हातात स्टम्प घेऊन आलेला पाहून रिषभने त्याला प्रश्न विचारला की 'भैय्या, तू स्टम्प घेऊ कुठे जात आहेस? त्यावर रोहित त्याला म्हणाला, 'काय? निवृत्ती घेऊ? जिंकल्यानंतर काय प्रत्येकवेळी निवृत्ती थोडी ना मी घेणार आहे?' त्यावर रिषभ त्याला म्हणाला, 'आम्हाला तर वाटते की तू खेळत रहावा.'.खरंतर जून २०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे अनेकांना वाटले होते की चॅम्पियन्स ट्ऱॉफीनंतरही हे खेळाडू वनडेतून निवृत्त होऊ शकतात. मात्र या तिघांनीही वनडेतून निवृत्ती घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर मे २०२५ मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान, सध्या अशी चर्चा आहे की भारतीय संघव्यवस्थापन २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी युवा खेळाडूंचा विचार करत आहे. त्यामुळे विराट आणि रोहितला या संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात येत्या काही महिन्यात हे दोघेही वनडेतूनही निवृत्ती घेऊ शकतात..FAQs१. रिषभ पंतने शेअर केलेला व्हिडिओ कोणत्या सामन्यानंतरचा आहे?रिषभ पंतने शेअर केलेला व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम सामन्यानंतरचा आहे.(After which match is this video?)२. रिषभ पंतने हा व्हिडिओ कधी शेअर केला?रिषभ पंतने १५ ऑगस्ट २०२५ रोजी हा व्हिडिओ शेअर केला.(When did Rishabh Pant share the video?)३. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अंतिम सामना कोणत्या संघाविरुद्ध झाला होता?भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला होता(Which team did India face in the Champions Trophy 2025 final?)४. रोहित शर्माने निवृत्तीबाबत काय म्हटले?"जिंकल्यानंतर प्रत्येकवेळी निवृत्ती थोडी ना मी घेणार आहे?" अशी मस्करी रोहित शर्माने केली.(What did Rohit Sharma say about retirement?)५. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने कोणत्या फॉरमॅटमधून आधी निवृत्ती घेतली होती?रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून आधी निवृत्ती घेतली.(From which formats had Rohit, Virat, and Jadeja already retired?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.