
IND vs AUS Test Series : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा दुसरा कसोटी सामना १० विकेट्ने गमावला. या यामन्यात भारतीय फलंदाज व गोलंदाज सर्वांनीच खराब कामगिरी केली. गोलंदाजाच्या खराब कामगिरीचा उल्लेख करत रोहित शर्माने गोलंदाजी युनीटला खडे बोल सुनावले. "जसप्रीत बुमराह किती भार सांभाळणार ?" या शब्दात रोहितने गोलंदाजांना खडसावले.
भारतीय उप-कर्णधार जसप्रीत बुमराह मागील दोन्ही कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळाला. त्याने पर्थ कसोटीत एकूण ८ विकेट्स घेतले. ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात फायफर (५ विकेट्स) घेतला होता. तर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ४ विकेट्स घेतले.