Rohit Sharma’s next ODI match for India after Champions Trophy
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तीन चॅम्पियन्स ट्रॉफी नावावर असलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले २५२ धावांचे लक्ष्य टीम इंडियाने सहज पार केले. रोहितने ७६ धावांची वादळी खेळी केल्यानंतर श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी विजयात हातभार लावला.