

Rohit Sharma
esakal
BCCI on Rohit Sharma retirement: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात अचानक हालचाली सुरू झाल्या. माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग पकडला.. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर रोहित (Rohit Sharma) लॉर्ड्स वन डे सामन्यानंतर निवृत्ती घेणार का? असा प्रश्न पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली गेली. मात्र, रोहित या चर्चांना अखेर बीसीसीआयने पूर्णविराम दिला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक वनमडे सामना रविवारी (१९ जुलै) लॉर्ड्सवर खेळवला जाणार असून, याच सामन्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटला अलविदा करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या सर्व अफवा फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे.