

Rohit Sharma retirement rumours
esakal
Rohit Sharma parents reached London retirement latest news: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला(Rohit Sharma) फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.
त्यामुळे इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणारा तिसरा आणि अंतिम वनडे सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो, अशा चर्चांना सध्या जोर आला आहे. दरम्यान, रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये पोहोचल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विविध मीडिया रिपोर्ट्समध्येच अशा दाव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.