Despite retirement, Rohit Sharma influenced Team India : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने ७ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्याच्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवले गेले आहे. २० जूनला भारत-इंग्लंड मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी टीम इंडियात बदल झालेला दिसतोय. रोहित शर्माच्या एका कॉलमुळे हा बदल झाल्याचे समोर आले आहे. कारण, रोहितच्या एका कॉलने मुख्य प्रशिक्षक गौतम गभीर ( Gautam Gambhir) याचे मन वळले आणि टी दिलीप ( T Dilip) याची भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये रिएन्ट्री झाली.