Rohit Sharma plants the stump भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून इतिहास रचला. चॅम्पियन्स ट्रॉफी व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा तो महेंद्रसिंग धोनीनंतर भारताचा दुसरा कर्णधार ठरला. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर रोहित भावनिक झालेला पाहायला मिळाला, या एका क्षणासाठी सर्व खटाटोप केला होता, हे त्याच्या डोळ्यांतून जाणवत होते. रोहित सामना संपल्यानंतर पत्नी रितिकाकडे गेला आणि तिला प्रेमाने मिठी मारली. नंतर तो पुन्हा मेडल सेरेमनीला निघून गेला आणि तिथून आल्यावर आपल्या गळ्यातील मेडल लाडकी लेक सॅमीच्या गळ्यात घातलं. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.