

Rohit Sharma Receives Padma Shri Award
esakal
Rohit Sharma receives Padma Shri award from President of India: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू, मुंबईची शान रोहित शर्मा प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. भारतीय क्रिकेटसाठी त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत आणि संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
आता त्याच्या नावावर आणखी एका मोठ्या सन्मानाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी रोहित शर्माला प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.