Rohit Sharma Retirement: रोहित शर्मासह 'लॉर्ड्स'वर विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यास आश्चर्य वाटायला नको! गौतम गंभीरच्या सर्वच इच्छा होतील पूर्ण...

Will Rohit Sharma retire after Lord's ODI? भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मासाठी लॉर्ड्सवरील तिसरा वन डे सामना अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चर्चा रंगली आहे. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीत संघ व्यवस्थापन आणि निवड समिती नव्या चेहऱ्यांवर भर देत असल्याचे संकेत मिळत असून, रोहितच्या भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत.
Will Rohit Sharma retire after Lord's ODI?

Will Rohit Sharma retire after Lord's ODI?

esakal

Updated on

Rohit Sharma Exit May Trigger Virat Kohli's Decision: हिटमॅन रोहित शर्मासाठी १९ जुलै २०२६, चा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या, रोहितला निवड समिती व संघ व्यवस्थापनाने, बाबा थांब... अशा सूचना केल्या आहेत. त्याचा फॉर्मही त्याच्यावर रुसल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला संधीच मिळाली आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी रोहितला तू बिनधास्त खेळ, संघातील जागेची पर्वा करू नको असा सांगणारा गौतम गंभीर... आता थांब २०२७ च्या वर्ल्ड कप योजनेत तू नाहीस, असे हिटमॅनला सांगून मोकळा झाला. त्यामुळेच लॉर्ड्सवर रविवारी होणारा India vs England तिसरा वन डे सामना हा त्याचा शेवटचा असेल... यानंतर रोहित निवृत्ती घेईल की देशांतर्गत स्पर्धा गाजवून पुन्हा टीम इंडिया कमबॅक करेल, ते रविवारीच स्पष्ट होईल. पण, जर रोहितने निवृत्ती घेतली आणि त्याचवेळी विराट कोहलीनेही थांबण्याचा निर्णय घेतला तर काय? यापूर्वी दोनवेळा असे घडलेले दिसलेय आणि आताही हे घडू शकते...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com