Rohit Sharma century in Vijay Hazare Trophy vs Sikkim
esakal
Mumbai vs Sikkim Rohit Sharma innings Vijay Hazare Trophy: सात वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणाऱ्या रोहित शर्माने सिक्कीमविरुद्ध खणखणीत शतक झळकावले. मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करताना २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या रोहितने शतक झळकावले. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेला हा सामना पाहण्यासाठी दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती होती. रोहितनेही ( Rohit Sharma century) त्यांना निराश केले नाही आणि लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचे वेगवान शतक पूर्ण केले.