Rohit Sharma emotional moment with family at Wankhede
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचं स्टँड आता ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर दिसणार आहे. ज्या मैदानावर खेळण्याचं स्वप्नपाहून तो नागपूरहून मुंबईत आला होता, आज त्याच स्टेडियमवर त्याच्या नावाचं स्टँड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी रोहितचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होतं. मुंबई इंडियन्सचे सहकारीही मैदानावर होते. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करणारा रोहित मनानं किती हळवा आहे, याचे दर्शन आज झाले. फॅमिली मॅन कसा असावा, तर रोहितसारखा.. असं अनेकांना वाटलं असेल. कारण तो त्याच्या आई-वडिलांची ज्या पद्धतीने काळजी घेत होता, ते पाहून त्याचे चाहते भारावले.